जिल्ह्यात होणार फार्मा हब ; पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

Foto
औरंगाबाद : नागपूर- मुंबई समध्दी महामार्गालगत फार्मा हब विकसित करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.  ऑटो क्लस्टर म्हणून शहराची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आता फार्मा कंपन्यांचा एक ग्रुप तयार करून फार्मा हब तयार करण्यात येणार असल्याचे रावल यांनी सांगितले. आज सकाळी वाळूज येथील मसीआ उद्योग संघटनेच्या कार्यालयात उद्योजकांशी पर्यटनमंत्र्यांनी चर्चा केली. औरंगाबादेत डीएमआयसी तसेच समृद्धी महामार्गालगत उद्योगांची भरभराट होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. 

उद्योग आणि पर्यटन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने या दोन्हीही गोष्टींची सांगड घालून विकास केला जाईल, असे ते म्हणाले. जानेवारी महिन्यात होणार्‍या औद्योगिक प्रदर्शनासाठी चिकलठाणा येथील पर्यटन विभागाचे कलाग्राम देखील या छोट्या उद्योजकांना सवलतीच्या दरात ऊपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन रावल यांनी दिले.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या (मसिआ) वाळूज येथील कार्यालयाला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज सकाळी भेट दिली. यावेळी राज्यमंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, एमटीडीसी प्रादेशिक अधिकारी विजय जाधव, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, नारायण पवार, अभय हंचनाळ, मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, राहुल मोगले आदी मान्यवर उपस्थित होते.

मसिआच्या वतीने औरंगाबादमध्ये ‘फार्मा हब’ उभारावे, तसेच कलाग्राम स्वस्त दरात द्यावे यासह आदी मागण्या ‘मसिआ’तर्फे मांडण्यात आल्या. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी औरंगाबादमध्ये ‘फार्मा हब’ उभारण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. याशिवाय कलाग्राम कमी शुल्कात उपलब्ध करुन दिले जाईल, ही मागणी मान्य केली.

पर्यटन वाढीसाठी करणार प्रयत्न
म्हैसमाळला जाण्यासाठी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे म्हैसमाळचा रस्ता सुधारण्यात येईल. याशिवाय अजिंठा रस्ता कामालाही गती आण्यात येईल. 
त्याचबरोबर औरंगाबादमध्ये आठ ते दहा विमानसेवा वाढविण्यात येईल. तसेच अजिंठा लेणी, वेरुळ लेणी येथे पर्यटकांसाठी फाईव्ह स्टार सुविधा रिसॉर्ट उभारण्यात येईल. जेणेकरुन पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध होईल, असेही पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले. वेरुळ लेणीला जाण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय ‘हेरिटेेज सिटी’ म्हणून औैरंगाबादची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी विशेष बस सुरु करणार
औरंगाबाद, वेरुळ लेणी, अजिंठा आदी पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटकांना विशेष बस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker